नाशिकमध्ये राष्ट्रवादी फार्मात, काँग्रेसचे माजी आमदार प्रवेश करण्याची शक्यता

NCP - Asif Shaikh

नाशिक : राज्यात काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यपदी माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची वर्णी लागली आहे. मात्र, पटोले यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याआधीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मालेगावमधील माजी आमदार असिफ शेख (Aasif Sheikh) यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन काँग्रेसला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे त्यांनी नवनिर्वाचित प्रेदशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामासुद्धा पाठवला आहे. त्यांच्या राजीनाम्याचे कारण अजून गुलदस्त्यात असून ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीकडून (NCP) काँग्रेसला हा मोठा धक्का असणार आहे.

राज्यात आगामी निवडणुका तसेच पक्षीय बांधणी लक्षात घेऊन काँग्रेसमध्ये अनेक बदल करण्यात येत आहेत. पक्षाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्य़क्षपदही बदलले. मात्र, असे असले तरी मालेगाव येथील माजी आमदार असिफ शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आपला राजीनामा नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला आहे. असिफ शेख यांचे वडील रशीद शेखसुद्धा काँग्रेसचे माजी आमदार आहेत. ते काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. असिफ शेख यांच्या अचानपणे राजीनामा देण्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. असिफ यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण अद्याप समजून शकलेले नाही.

दरम्यान, असिफ शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत काँग्रेसला रामराम ठोकल्याने राजकीय गोटातून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार असिफ शेख हे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जोर धरु लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER