केदारनाथांच्या दर्शनासाठी गेलेल्या माजी मुख्यमंत्री उमा भारती कोरोनाबाधित

Uma Bharti

भोपाळ : देशात कोरोनाचा (Corona virus) कहर सुरूच आहे. मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती (Uma Bharti) यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजकारण आणि मनोरंजन विश्वातही कोरोनानं शिरकाव केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याच्या माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे. उत्तराखंड येथील केदारनाथांच्या दर्शनासाठी गेल्या असतांना त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

केदारनाथचे दर्शन करतानाचा व्हिडीओही त्यांनी पोस्ट केला होता. कोरोना झाल्याचे त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे. कोरोना झाल्यानंतर उमा भारती यांनी ऋषिकेश आणि दरिद्वारच्या दरम्यान वंदे मातरम कुंजमध्ये स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. मी केदारनाथ दर्शनानंतर प्रशासनाकडे आग्रह करत कोरोना चाचणी पथकाला बोलावले. कारण मला तीन दिवस ताप होता. मी हिमालयात सोशल डिस्टन्सिगसह सर्व नियमांचे पालन केले. पण तरीही मला कोरोनाची लागण झाली आहे, असं उमा भारती यांनी पोस्ट करत सांगितले.

सध्या त्या वंदे मातरम् कुंज इथे क्वारंटाइन सेंटरमध्ये आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानं पुढील निर्णय घेईन, ४ दिवसांनी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करेन आणि त्यानंतर डॉक्टरांचा सल्ल्यानं निर्णय घेईन अशी माहिती त्यांनी दिली. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली कोरोना चाचणी करावी असं आवाहन त्यांनी ट्वीट करून केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER