माजी मुख्यमंत्री फडणवीस यांची वट्टमवार – मुकदम यांनी घेतली सदिच्छा भेट

Former CM Fadnavis in nanded

लोहा/तालुका प्रतिनिधी :- राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नांदेड दौर्‍यावर आले असता खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या साई सुभाष बंगल्यावर लोह्याचे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार व उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली .

रतन टाटांचा नारायण मूर्तींनी पायापडून घेतला आशीर्वाद!

जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. नांदेडच्या वसंत नगरातील साई – सुभाष बंगल्यावर लोह्याचे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम यांनी सदिच्छा भेट घेतली सत्कार केला. पंचायत समितीचे माजी उपसभापती रोहित पाटील यांनी ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. तसेच गुणीना बस पार्सल चे मुख्य वितरक गिरीश चन्नावार हजर होते यावेळी खा चिखलीकर यांनी यासर्वांची ओळख माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना करून दिली.