…त्यांनी न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा तर प्रयत्न केला नाही ना? शरद पवारांनी व्यक्त केली शंका

Ranjan Gogai& sharad Pawar

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) माजी सरन्यायाधीश व राज्यसभेचे सदस्य रंजन गोगोई (Ranjan Gogoi) यांनी एका कार्यक्रमात बोलताना न्यायपालिकेच्या न्यायदानाबद्दल धक्कादायक विधान केले आहे . गोगोई यांनी केलेल्या विधानावर भूमिका मांडताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही शंका उपस्थित केली आहे. त्यांनी या विधानातून न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा प्रयत्न तर केला नाही ना? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला आहे.

राज्यसभा खासदार आणि माजी सरन्यायाधीश यांनी जे काल विधान केले आहे. ते अंत्यत धक्कादायक आहे. त्यांनी विधानातून न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा प्रयत्न तर केला नाही ना?, हे मला ठाऊक नाही. तसेच त्यांनी केलेल विधान प्रत्येकासाठी चिंता निर्माण करणारं ठरणार आहे. या बद्दल माझ्या मनात शंका नाही,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मोठ्या कंपन्यांना न्यायालयात जाऊन संधी घेणं परवडते, इतरांना नाही. जर तुम्ही न्यायालयात गेलात तर तुमचेच मळलेले कपडे धूत बसता. तुम्हाला न्याय मिळत नाही. देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचाराल तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही, तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही, असे विधान माजी सरन्यायाधीश गोगोई यांनी केले होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER