‘ईस्टर्न फ्री वे’ला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे नाव देणार

Vilasrao Deshmukh

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात त्यांनी रस्ते मार्गांसाठी मोठ्या निधीची घोषणा केली आहे. सोबतच मुंबईतील ‘ईस्टर्न फ्री वे’ला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao deshmukh) यांचे नाव देण्याची घोषणाही अजित पवारांनी केली आहे. ही मागणी पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

अस्लम शेख यांची मागणी मान्य करण्यात आली आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे नाव आता ‘ईस्टर्न फ्री वे’ला दिले जाणार आहे. मुंबईची वाहतूक अडचणी लक्षात घेत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणाऱ्या पूर्ण मुक्त मार्गाची संकल्पना मांडली होती. त्यांच्याचमुळे हा मार्ग तयार होऊ शकला, या मार्गाला आता विलासराव देशमुखांचे नाव दिले जाणार आहे.

वैशिष्ट्ये –

  • दक्षिण मुंबईतून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जाण्यासाठी ‘ईस्टर्न फ्री वे’ महत्त्वाचा आहे.
  • या ‘ईस्टर्न फ्री वे’ची लांबी १६.८ किलोमीटर आहे.
  • दक्षिण मुंबईतील पीडीमोलो रोडपासून ते चेंबूरमधील पूर्व द्रुतगती मार्गाला हा जोडला जातो.
  • हा रस्ता बृहन्मुंबई मनपाच्या ताब्यात आहे.

महत्वाच्या घोषणा –

महामार्गाचे काम ४४ टक्के पूर्ण

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराज महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम ४४ टक्के पूर्ण झाले आहे. ७२० किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला करणार आहे. या मार्गाचा मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना या जिल्ह्याच्या विकासासाठी ‘स्टार प्रवाह’ या उद्देशाने नांदेड ते जालना मार्गाचे ७ हजार कोटी रुपयांचे काम हाती घेणार आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, मुंबई-गोवा महामार्ग

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १०.५ किलोमीटर लांबीच्या दोन भुयारी मार्गाच्या तसेच २ किलोमीटर लांबीच्या दोन पूलांचा समावेश आहे. यात ५९५ कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. ते डिसेंबर २०२२पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय ठरणारा आणि कोकणाच्या विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा मार्ग असणार आहे.

चक्राकार मार्गाची उभारणी

राज्यातील कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक पुणे शहरात आहे. यामुळे शहराच्या वाहतुकीवर मोठा ताण येतो. त्यामुळे पुण्यावरून चक्राकार मार्ग उभारण्याची गरज आहे. त्यासाठी सुमारे १७० किलोमीटर लांबीच्या २६ हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल. या मार्गामुळे शहरातील वाहतुकी कोंडीच्या समस्येवर मात करता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER