भाजपाच्या माजी केंद्रीय मंत्र्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

Yashwant Sinha

कोलकाता :- तृणमूल काँग्रेसमधून (Trinamool Congress) भारतीय जनता पार्टीत (BJP) येणाऱ्या नेत्यांची रांग लागली असताना नाराजीमुळे भाजपा सोडणारे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिंहा (८३) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

मतभेदांमुळे सोडली होती भाजपा

वाजपेयींच्या काळात भाजपाच्या थिंक टँकमध्ये यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांचा समावेश होता. मात्र, मोदींच्या काळात झालेल्या पराकोटीच्या मतभेदांमुळे यशवंत सिन्हा यांनी २०१८ मध्ये भाजपाला रामराम ठोकला. मात्र, त्यांचा मुलगा जयंत मात्र अजूनही भाजपातच आहे. मोदींच्या पहिल्या कार्यकाळात ते हवाई वाहतूक राज्यमंत्री होते. भाजपा सोडल्यापासून यशवंत सिन्हा राजकीय क्षेत्रापासून दूर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER