भाजप माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांकडून दणका, ‘त्या’ प्रकरणात केली अटक, जाणून घ्या प्रकरण

Sanjay Kakade

माजी खासदार संजय काकडे यांना आज (बुधवार) पुणे पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना विचारले असता त्यांनी होय, संजय काकडे (Sanjay Kakade) यांना अटक केली असल्याचं सांगितलं. कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे हा तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या शेकडो समर्थकांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर रॅली काढली होती. त्यामध्ये शेकडो वाहनांचा समावेश देखील होता. या प्रकरणातील दाखल गुन्ह्यात कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

यापुर्वी कुख्यात गुंड गजानन मारणे याला सातारा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आणि त्याची रवानगी कारागृहात केली. सध्या त्याला पुण्याबाहेरील तुरूंगात हलवले आहे. दरम्यान, माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती लवकरच देण्यात येईल अशी माहिती पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button