भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

Sardar Tara Singh

मुंबई : भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि मुंबईतील मुलुंड मतदारसंघातील माजी आमदार सरदार तारासिंह (Sardar tara singh) यांचे निधन (Pass Away) झाले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली. आज सकाळी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. भाजपा नेते किरीट सौमय्या यांनी ट्वीट करून सरदार तारा सिंह यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सौमय्या यांनी ट्वीट करत म्हटले की, ‘माझे ज्येष्ठ सहकारी, भाजप नेते सरदार तारासिंह यांचे प्रदीर्घ आजाराने आज सकाळी लिलावती रुग्णालयात निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो’,

सरदार तारासिंह हे मुंबईतील मुलुंड मतदारसंघातून सलग चार वेळा आमदारपदी निवडून आले होते. मात्र २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. सरदार तारा सिंह यांनी मुंबई महापालिकेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी नगरसेवक म्हणूनही काम पाहिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER