भाजपाच्या माजी आमदारावर पक्षाच्याच नगरसेविकेचे गंभीर आरोप

मुंबई :- मीरा भाइंदर भाजपाचे सर्वेसर्वा व माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या विरोधात भाजपाच्याच नगरसेविका नीला सोन्स यांनी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांना तक्रार केली आहे. विशेष म्हणजे पीडित नगरसेविकेने याबाबत भाजपाच्या वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्याकडे त्यांनी सपशेल दर्लक्ष केलं आहे.

अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय तूरखरेदीत शेतकऱ्यांना अडचण येऊ देऊ नये – उपमुख्यमंत्री अजित पवार

त्यामुळे नरेंद्र मेहता प्रकरणामुळे भाजपाची अधिवेशनादरम्यान कोंडी होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या मीरा-भाइंदरमधील नगरसेविका नीला सोन्स यांनी नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मेहतांकडून गेल्या काही वर्षांपासून अत्याचार होत असून मला व कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. मेहता यांनी अनेक महिलांचं शोषण केल्याचा आरोप नीला सोन्स यांनी केला आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून न्याय न मिळल्याने नीला यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. नीला सोन्स यांनी आमदार नरेंद्र महेतांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.