माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन

Dean Jones

मुंबई : ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक डीन जोन्स (Dean Jones) (५९) यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते आयपीएलमधील प्रसिद्ध समालोचक होते.

गुरुवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, डीन मर्व्हिन जोन्स यांचे आज निधन झाले, अशी माहिती स्टार इंडियाने एका पत्रकाद्वारे दिली. “डीन मर्व्हिन जोन्स यांचे आज निधन झाले. अचानक गुरुवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आणि त्यांचा मृत्यू झाला.

आम्ही त्याच्या कुटुंबीयांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त करतो. देव त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण परिस्थितीत दु:ख पचवण्याची शक्ती देवो. जोन्स यांच्याबाबत आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी आम्ही ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांशी संपर्क साधत आहोत. ” असे स्टार इंडियाने पत्रकात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER