
गुवाहटी : आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई (Tarun Gogoi) यांचे गुवहाटी येथे सोमवारी सायंकाळी निधन झाले. आसामचे आरोग्य मंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर तरुण गोगोई यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. त्यानंतर गोगोई यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तरुण गोगोई यांनी आसाममध्ये सलग तीन टर्म मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले होते. काँग्रेसमध्ये त्यांनी केंद्र आणि राज्य पातळीवर महत्वाच्या पदांवर काम केले होते.
माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना गुवाहाटीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गोगोई यांची प्रकृती सुधारण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र डॉक्टरांना यश आले नाही.
तरुण गोगोई हे २५ ऑक्टोबरला कोरोना (Corona) पॉझिटिव्ह आढळून आले होते. कोरोनावर मात केल्यानंतर २ नोव्हेंबरला त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. तेव्हापासून गोगोई यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरु होते. तरुण गोगोई हे २००१ ते २०१६ पर्यंत सलग तीन वेळा आसामचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला