रोहित पाटलांच्या रुपाने राष्ट्रवादीला पुन्हा धडाडीचं नेतृत्व मिळालं – डॉ. अमोल कोल्हे

Rohit Patil And Amol Kolhe

सांगली : महाराष्ट्रात असा एकही मतदारसंघ आढळला नाही ज्यात आर.आर आबांची आठवण झाली नाही. रोहित पाटलांच्या रुपाने तासगाव-कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा धडाडीचं उत्साही नेतृत्व लाभलं आहे. ही विधानसभेची निवडणूक दोन पक्षातील निवडणूक नाही, उमेदवारांची निवडणूक नाही, ही दोन विचारांची निवडणूक आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. तासगाव कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादी उमेदवार सुमन पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

ही बातमी पण वाचा :- मग झुणका भाकर आणि शिव वडापावचे काय झाले? : खा. अमोल कोल्हेंचा सवाल

यावेळी ते म्हणाले की, देशप्रेम आमच्या नसा नसात वाहतोय, रिकाम्या पोटी सैन्य कधी लढू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवली. आमची पोरं सकाळी सकाळी धावत असताना, लष्करात, पोलिसांत भरती होण्यासाठी जीव तोडून मेहनत करत असतात तरीही पोलीस भरती झाली नाही. आबांच्या काळात ६५ हजार पोलीस भरती झाली होती. पण या काळात किती झाली? असा प्रश्नही त्यांनी येवले सरकारला विचारला.

दरम्यान, सध्या देशात भयानक बेरोजगारीचं प्रमाण वाढलं, युवकांना रोजगार उपलब्ध नाही, अनेक कंपन्यातील लोकांना काढलं जातं आहे. ही हसण्याची परिस्थिती नाही तर चिंतेची परिस्थिती नाही. ज्या माणसाने उभं आयुष्य मेहनत केली, त्यांची बायका-पोरं घरात असतात त्याची नोकरी जाते ही परिस्थिती त्याच्यासमोर उभी राहते ती आपल्याबाबतीत होईल.असा इशाराही अमोल कोल्हे यांनी यावेळी दिला.