लॉकडाऊनच्या काळातले वीज बील माफ करा; २७ ला स्वाभिमानीचे आंदोलन

Raju Shetty

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बील माफ करा, या मागणीसाठी २७ ॲाक्टोंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर महावितरणच्या कार्यालयांना ‘टाळे ठोको’ आंदोलन करणार आहे, अशी माहिती संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी दिली.

लॉकडाउन काळातील घरगुती वीज बिल माफ व्हाव यासाठी यापूर्वी अनेक वेळा आम्ही सरकारला विनंती केली आहे. मात्र अद्यापही ठोस निर्णय न झाल्याने आम्हाला आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले, असे शेट्टी म्हणाले.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, या काळातील विजेचे देयक हा मुद्दा वादाचा ठरला होता. त्याबाबत अनेकदा तोडगा शोधण्याचे आश्वासन देण्यात आले पण ठोस कारवाई झाली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER