
मुंबई :- भाजपचे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली नाही. त्यावरून भाजप आक्रमक झाली आहे. काल देशभर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती उत्साहात साजरी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी याच निमित्ताने नऊ कोटी शेतकऱ्यांना 18 हजार कोटी निधी वितरित केला.
पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाजपेयींचा विसर पडला का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावरून अभिवादनाचा फोटो किंवा ट्विट केलं नाही. हाच मुद्दा पकडून भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं.
ही बातमी पण वाचा : भाजपाच्या आशिष शेलारांनी केलं उद्धव ठाकरेंच्या मुलाचे तोंडभरून कौतुक, म्हणाले…
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे विस्मरण काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना झाले. सत्तेसाठी अशा अनेक गोष्टी सोईस्करपणे विस्मृतीत टाकल्या जात आहेत. अटलजींच्या शब्दात सांगायचे तर “छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता”, असे ट्विट शेलार यांनी केले आहे.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे विस्मरण काल मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना झाले.
सत्तेसाठी अशा अनेक गोष्टी सोईस्करपणे विस्मृतीत टाकल्या जात आहेत. असो.
अटलजींच्या शब्दात सांगायचे तरछोटे मन से कोई बड़ा नहीं होता,
टूटे मन से कोई खड़ा नहीं होता.— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 26, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला