यांनी निवडले विदेशी जोडीदार

Pretty Zindta -Priyanka Chopra

‘परदेसियों से ना अंखिया मिलाना, परदेसी को तो है एक दिन जाना’ असे एक अत्यंत लोकप्रिय गाणे शशी कपूर अभिनीत जब जब फूल खिले सिनेमात आहे. याचा अर्थ असा कि परदेशातील कोणावरही प्रेम करू नये, तो सोडून जाऊ शकतो. हिंदी सिनेमात परदेसीवरून अनेक गाणी आहेत ज्यात ‘परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के’ असेही एक प्रचंड लोकप्रिय गाणे आहे ज्यात प्रेयसी प्रियकराला सोडून जाऊ नको म्हणत असते. तर तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे असेही एक हिट गाणे आहे. असे असले तरी बॉलिवुडमधील अनेक कलाकारांंनी आपला जोडीदार म्हणून विदेशी नागरिकत्व असलेल्यांचीच निवड केली आहे. आज हे आठवण्याचे कारण म्हणजे प्रख्यात दिग्दर्शक अली अब्बास जफरचे लग्न. अली अब्बासने फ्रांसची नागरिक असलेल्या अलिशियाबरोबर लग्न केले पण ते लपवून ठेवले होते. एखाद्या परदेशी नागरिकाबरोबर लग्न केलेला अली पहिलाच बॉलिवुड कलाकार नाही. इतरही नायक-नायिका असे आहेत ज्यांनी परदेशी रिकांमध्ये आपला जोडीदार शोधला आहे. म्हणतात ना जोड्या देव बनवून पाठवतो आणि ते कुठेही असले तरी देव त्यांचे मिलन घडवून आणतो ते या उदाहरणांवरून स्पष्ट होते. अशाच कलाकारांवर एक नजर-

अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) हा बॉलिवुडमधील प्रचंड यशस्वी दिग्दर्शक आहे. त्याने आजवर सलमान खानसोबत ‘सुल्तान’, ‘भारत’ आणि ‘टायगर जिंदा है’ हे सिनेमे दिले आहेत. आता लवकरच मुख्य भूमिकेत सैफ अली असलेली त्याची ‘तांडव’ नावाची वेबसीरीज प्रसारित होणार आहे. या अलीने 3 जानेवारी रोजी डेहराडूनमध्ये गपचुप लग्न केले. त्याने जेव्हा सोशल मीडियावर फोटो टाकले तेव्हा लोकांना त्याची लग्नाची माहिती मिळाली. अलीची पत्नी आहे अलिशिया. अलिशिया ही मूळची फ्रांसची असून बॉलिवुडमध्ये करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली. अलीच्या सलमान खान अभिनीत ‘भारत’मध्ये नायिका दिशा पाटणीच्या गाण्यात अलिशिया बॅकग्राउंड डांसर म्हणून दिसली होती. या सिनेमाच्या सेटवर अली आणि अलिशियामध्ये आंख मिचौली झाली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आता त्यांनी लग्न केले

कपूर घराण्यातील शशी कपूर यांनी बॉलिवुडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. सिनेमासोबतच नाटकांवरही त्यांचे प्रेम होते. शशी कपूर (Shashi Kapoor) यांनी 1958 मध्ये परदेशी जेनिफर कँडलसोबत लग्न केले होते. पृथ्वी थिएटरमध्ये या दोघांची भेट झाली होती आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेमात पडल्यानंतर दोघांनी लग्नही केले.

फिरोज खानद्वारा निर्मित फरदीन खान अभिनीत ‘जानशीन’मधून रुपेरी पडद्यावर आलेल्या आणि ‘सिलसिले’, ‘नो एंट्री’, ‘गोलमाल’ अशा काही सिनेमांमध्ये काम करून लोकप्रिय झालेल्या सेलिना जेटलीने (Celina Jaitley) 2011 मध्ये ऑस्ट्रियामधील एका हॉटेलियरशी पीटर हागशी लग्न करून सगळ्यांचा चकित केले होते. या दोघांना आता दोन मुलेही आहेत.

बॉलिवुडमधील बबली गर्ल म्हणजे प्रीती झिंटा. तिने तिच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले होते. याच प्रीती झिंटाने 29 फेब्रुवारी 2016 मध्ये तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या अमेरिकन जीन गुडइनफबरोबर लग्न केले. लॉस एंजिलिसमध्ये या दोघांनी फक्त ठराविक मित्र आणि नातेवाईंकांच्या उपस्थितीत लग्न केले. या लग्नाबाबत बॉलिवुडमध्ये कोणालाही माहिती नव्हते. सहा महिन्यांनी जेव्हा प्रीतिच्या लग्नाचे फोटो समोर आले तेव्हा त्यांच्या लग्नाची माहिती बॉलिवुडला मिळाली.

‘गली गली में चोर है’ ‘दृश्यम’ सिनेमांमुळे चर्चेत आलेल्या श्रिया सरननेही मार्च, 2018 मध्ये एका रशियन खेळाडूशी गपचुप लग्न केले होते. आंद्रेई कोश्चेव असे या रशियन खेळाडूचे नाव असून तो प्रख्यात टेनिस प्लेयर आहे. ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने या दोघांनी लग्न केले.

 

बॉलिवुडची प्रियांका चोप्रा आता ग्लोबल सेलिब्रिटी झाली आहे. याचे कारण तिने निक जोनासबरोबर केलेले लग्न. बॉलिवुडमध्ये अनेकांसी प्रियांकाचे नाते जुळले होते पण म्हणतात गाठी स्वर्गात बांधल्या गेलेल्या असतात त्याप्रमाणे प्रियांकाने हॉलिवुडमधील तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या गायक अभिनेता निक जोनासबरोबर डिसेंबर 2018 मध्ये लग्न केले. या दोघांचेही ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने लग्न केले.

प्रख्यात मॉडेल आणि बॉलिवुडमध्ये लीजा रेने ‘ऐ दिल है मुश्किल’, ‘आयशा’, ‘रास्कल’, ‘क्वीन’, ‘द शौकीन्स’, ‘संता बंता प्राइवेट लिमिटेड’, ‘हाउसफुल-3’ या हिट सिनेमांमध्ये काम केले आहे. लीजा ने 29 ऑक्टोबर 2016 ला ब्रिटिश बॉयफ्रेंड जेसन डेन्हीसोबत लग्न केले. या दोघांना जुळ्या मुली आहेत.

याशिवाय काही सिनेमात दिसलेल्या अरुणोदय सिंह याने कॅनडाच्या ली एल्टनसोबत लग्न केले. ली गोव्यात कॅफे चालवते. अरुणोदय सिंह हा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अर्जुन सिंह यांचा नातू आहे. तर सुचित्रा पिल्लईने डेन्मार्कमध्ये राहाणाऱ्या कॉम्प्युटर इंजीनियर लार्स कॅल्डलसनबरोबर लग्न केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER