परदेशी राजकारण्यांनी भारतीय नेत्यानबद्दल अवमानकारक बोलू नये – संजय राऊत

Sanjay raut-

मुंबई :- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी त्यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ पुस्तकात राहुल गांधी यांचा उल्लेख नर्व्हस’ आणि कमी योग्यतेचे नेते, असा केला. यावर नाराजी व्यक्त करताना शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत – परदेशातील राजकारणी भारतातील राजकीय नेत्यांबद्दल अशी मते व्यक्त करु शकत नाहीत. ‘ट्रम्प वेडे आहेत’ असे आपण म्हणत नाही. बराक ओबामा यांना भारताबद्दल किती माहिती आहे?

“राहुल गांधी (Rahul Gandhi) हे असे विद्यार्थी आहेत ज्याने अभ्यासक्रम पूर्ण तर केला आहे आणि ते शिक्षकांना प्रभावित करण्यास उत्सुक आहेत. परंतु त्या विषयात प्रावीण्य मिळवण्याची योग्यता त्यांच्यात नाही. किंवा त्या विषयात प्रावीण्य मिळविण्याची जिद्द त्यांच्यात नाही,” असे ओबामा यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : सरकार पाच वर्षे चालणार, उद्धव ठाकरेच राहणार मुख्यमंत्री : संजय राऊत

न्यूयॉर्क टाईम्सने ओबामा यांच्या ‘ए प्रॉमिसिड लँड’ या आत्मचरित्राचा आढावा घेतला. त्यात बराक ओबामा यांनी जगभरातील राजकीय नेत्यांव्यतिरिक्त इतर विषयांवरही भाष्य केले आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाच्या आढाव्यानुसार ओबामा राहुल गांधींबद्दल म्हणतात की, “राहुल गांधी यांच्यात एका घाबरलेल्या विद्यार्थ्याचे लक्षण आहेत. ज्या विद्यार्थ्याने आपला संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि त्याला आपल्या शिक्षकाला प्रभावित करायचे आहे. परंतु त्याच्याकडे त्या विषयात प्रावीण्य मिळवण्याची योग्यता नाही किंवा जिद्द नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER