जन्म परदेशात पण नाव कमवले बॉलिवूडमध्ये

Deepika Padukone - Alia Bhatt

बॉलिवूडमध्ये (Bollywood) काम करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळे केवळ भारतातील तरुण-तरुणीच नव्हे तर जगभरातून परदेशी नागरिक असलेल्यांसह मूळ भारतीय असलेलेही अनेक जण मुंबईत येऊन बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतात. यात काही जणांना यश मिळते तर काही जण अपयशी होऊन परत जातात. आमच्या वाचकांना कदाचित ठाऊक नसेल, पण सध्या बॉलिवूडमध्ये जे यशस्वी कलाकार आहेत त्यापैकी अनेकांचा जन्म परदेशातच झाला असून त्यांच्याकडे परदेशी नागरिकत्वच आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच परदेशी नागरिकत्व असलेल्या पण भारतीय कलाकार म्हणून यश मिळवलेल्या कलाकारांची माहिती देणार आहोत.

प्रचंड यशस्वी असलेल्या दीपिका पदुकोणचे (Deepika Padukone) नाव ड्रग्ज प्रकरणात आल्याने ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. फरहा खानने शाहरुख खानसोबत दीपिकाची ‘ओम शांती ओम’ मध्ये नायिका बनवून तिला रुपेरी पडद्यावर आणले होते. मात्र दीपिका भारतीय नाही हे फार कमी जणांना ठाऊक नाही. दीपिकाचा जन्म ‘डेनमार्क’मध्ये झाला असून ती डॅनिश नागरिक आहे. तिचे वडिल प्रकाश पदुकोण प्रख्यात बॅडमिंटनपटू असून दीपिकाही राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू आहे.

Deepika Padukone reportedly angry at her manager after leaked WhatsApp chats

दीपिकाप्रमाणेच आलिया भट्टही (Alia Bhatt) जन्माने भारतीय नाही. प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक महेश भट्टच्या या मुलीचा म्हणजे आलियाचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असून तिच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. करण जोहरने आलियाला ‘स्टुडंट ऑफ़ द ईयर’मधून बॉलिवुडमध्ये ब्रेक दिला होता.

Alia Bhatt Launches A YouTube Channel And Attracts 360K Subscribers In A Day

बॉलीवुड अभिनेत्री कॅटरीना कैफ (Katrina Kaif) भारतीय नाही हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र मॉडेलिंग करीत करीत ती मुंबईला आली. ‘बूम’ चित्रपटात अंगप्रदर्शन आणि ओंगळ भूमिका साकारून कॅटरिनाने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कॅटरीनाचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला असला तरी तिची आई ब्रिटिश असल्याने कॅटरीनाकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे.

There are days when I miss being on shoot: Katrina Kaif

जॅकलीन फर्नांडीसनेही (Jacqueline Fernandez) बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. जॅकलीन श्रीलंकन असून तिचा जन्म बहरीनमध्ये झाला आहे. जॅकलीनचे वडिल श्रीलंकंन तर आई मलेशियन आहे. जॅकलीनने 2009 मध्ये रितेश देशमुखसोबत ‘अलादीन’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

jacqueline fernandez

2011 मध्ये रणबीरकपूर सोबत ‘रॉकस्टार’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारी नरगिस फाखरीही (Nargis Fakhri) भारतीय नाही. नरगिसचा जन्म अमेरिकेत झाला असून तिच्याकडे अमेरिकन नागरिकत्व आहे. तिचे वडिल पाकिस्तानी तर आई कझाकिस्तानची आहे.

Bollywood star Nargis Fakhri to strike a pose at Dubai yoga fest | Arab News

आमिर ख़ान अभिनीत ‘धोबी घाट’ चित्रपटातून मोनिका डोगरा (Monica Dogra) ने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. मोनिका अभिनय आणि गायन या दोन्ही क्षेत्रात काम करीत आहे. अभिनयासोबतच गायनाची आवड असल्याने तिने काही सिंगलही रिलीज केले आहेत. ही मोनिका अमेरिकन असून तिच्याकडे अमेरिन पासपोर्ट आहे.

टेलीविजन शो में 'स्पेल' को पहली बार पेश करेंगी मोनिका डोगरा - Sabguru News

सनी लियोन (Sunny Leone) उर्फ करनजीत कौर वोहरा ची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. पोर्न स्टार असलेल्या सनीने 2011 मध्ये ‘बिग बॉस’ या रियालिटी शोमधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर महेश भट्ट यांनी तिला ‘जिस्म 2’ मधून संधी दिली. या चित्रपटानंतर सनीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. सनीचा जन्म कॅनडाचा असून ती कॅनेडियन नागरिक आहे.

Sunny Leone's shocking biography REVEALED | IWMBuzz

रणबीर कपूर दीपिका पदुकोण अभिनीत ‘यह जवानी है दीवानी’ चित्रपटातून एक नवी मुलगी समोर आली होती. ही मुलगी होती एव्हलिन शर्मा (Evelyn Sharma). जपंजाबी वडिल आणि जर्मन आई असलेल्या एव्हलीनचा जन्म जर्मनीत झाला असून ती जर्मन नागरिक आहे. एव्हलीनने ब्रिटनमध्ये शिक्षण घेतले आणि आता ती बॉलिवूडमध्ये काम करू लागली आहे.

Evelyn Sharma Engagement Boyfriend Tushaan Bhindi In Australia - एवलिन शर्मा ने बॉयफ्रेंड से की गुपचुप तरीके से सगाई, एक्ट्रेस ने किया अपने वेडिंग प्लान का खुलासा - Hindi ...

रजनीकांत आणि अक्षयकुमारसोबत काम केलेली अॅमी जॅक्सनही (Amy Jackson) परदेशी असून तिने ‘सिंह इज ब्लिंग’ आणि ‘रोबोट 2.0’ मध्ये काम केलेले आहे. 2012 मध्ये ‘एक दीवाना था’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. अॅमीचा जन्म डग्लस, ‘Isle of Man’ मध्ये झालेला आहे.

Amy Jackson

‘दम’ चित्रपटातील सुपरहिट गाणे ‘बाबू जी जरा धीरे चलो’ गाण्यामुळे याना गुप्ता (Yana Gupta) एका रात्रीत लोकप्रिय झाली होती. या गाण्यानंतर यानाकडे अनेक चित्रपटांची रांग लागली. केवळ हिंदीच नव्हे तर तामिळ आणि तेलुगु चित्रपटात यानाने अभिनय आणि आयटम साँग केलेले आहे. अशा या याना गुप्ताचा जन्म चेकोस्लोव्हाकियामध्ये झाला असून ती तेथील नागरिक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER