विमानतळावर 45 लाखांचे परकिय चलन जप्त : भुईमुंगाच्या शेंगातून आणल्या नोटा

Foreign currency of Rs 45 lakhs seized at delhi airport

नवी दिल्ली: भूईमूगाच्या शेगांमध्ये लपवून परदेशी चलन लपवून भारतात आणणा-या मुराद आलम नावाच्या प्रवाशाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)ने आज(बुधवार) दिल्लीतील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे अटक केली. याच आरोपीने काही नोटा बिस्कीटाचे पॅकेट आणि इतर खाण्यापिण्याच्या वस्तुंमध्ये लपवल्या होत्या. त्याच्याकडून 45 लाख रुपयांचे परकिय चलन जप्त करण्यात आले. सीआयएसएफने आरोपीला कस्टम विभागाकडे सोपवले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुराद आलम हा परदेशी चलन दुबईवरुन घेऊन आला होता. एअरपोर्टवर तैनात सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय झाला आणि त्यांनी त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याच्या सामानाची झाडाझडती घेतली असता हे परदेशी चलन आढळले.

यापूर्वी, मंगळवारी सीआयएसएफने इटलीला जात असलेल्या अमरीक सिंह यांच्याकडून चार जिवंत काडतुस जप्त करण्यात आले होते.