साखर कारखान्यांना पंचवीस बेडचे कोरोना केंद्र करण्याची सक्ती

Forcing sugar mills to have a 25-bed corona center

सातारा :  यंदा राज्यातील गाळप हंगामाला 15 ऑक्‍टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी साखर कारखान्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत गाळप हंगामासाठी ऑनलाईन अर्ज करावा, याशिवाय कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्व कारखान्यांना पंचवीस बेडचे (25 Beds)तात्पुरते केंद्र तयार करून त्या ठिकाणी डॉक्‍टर्स अन्न कर्मचाऱ्यांची व तोडणी मजुरांची सोय करावी अशा आशयाचे पत्र असे पत्र सहकार आयुक्तालयाने सर्व कारखान्यांना (sugar mills ) पाठवली आहेत.

मागील गळीत हंगामाच्या अखेरीस कोरोनाचा संसर्ग वाढला, त्यावेळी तोडणी यंत्रणा आपापल्या गावाकडे परतली होती. त्या वेळेत ऊस तोडणी करताना कारखान्याची मोठी दमछाक झाली होती. यंदाही कोरोना आहेच, म्हणून 25 बेडचे तात्पुरते हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. यंदा राज्यातील 185 साखर कारखान्यात सव्वा तीन लाख तोडणी कामगार येतील असा अंदाज आहे. मजुरांनी तोडणीसाठी येताना 50 वर्षांवरील व्यक्तीस आणू नये, अशा सूचना साखर आयुक्तालयाने कारखानदारांना दिल्या आहेत.

यंदा सर्वच कारखान्यानी तोडणी यंत्राला प्राधान्य दिले आहे. प्रत्येक कारखान्याने पाच ते दहा तोडणी यंत्रे भाडोत्री पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे. राज्यातील कारखान्यांनी तोडणी यंत्रांची मागणी केली असल्याने, ही यंत्र उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. राज्यातील 35कारखान्यींनी गाळपासाठी अर्ज केले आहेत. इतर कारखान्यांनी अद्याप अर्ज केलेले नाहीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER