आधी मायलेकींचे संरक्षण करा, सरकार कुणासाठी चालवता? – प्रवीण दरेकरेकरांची सरकारवर टीका

Pravin Darekar & Mahavikas Aghadi

पुणे : पुण्यातील (Pune) शिरूर तालुक्यात एका महिलेवर अत्याचार आरोपीने तिचे दोन्ही डोळे निकामी केले. यावर पत्रकार अर्णब गोस्वामी यांचा अटकेचा संदर्भ देऊन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका केली – सरकारविरुद्ध बोलणाऱ्या माध्यमांची गळचेपी करण्याआधी राज्यातील मायलेकींचे संरक्षण करा. सरकार कुणासाठी चालवता?

रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना बुधवारी अटक केली. त्यानंतर सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. या कारवाईवर भाजपाने आक्षेप घेत आंदोलने केली. पुण्यातील शिरूर तालुक्यामध्ये एका महिलेवर अत्याचार करत दोन्ही डोळे निकामी करण्यात आले. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत ‘सरकारविरुद्ध बोलणाऱ्या माध्यमांची गळचेपी करण्याआधी राज्यातील मायलेकींचे संरक्षण करा. सरकार कुणासाठी चालवता?’ असा सवाल उपस्थित केला आहे.

भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट केले आहे की, “सरकारविरुध्द किंवा आपल्या नेत्यांविरुध्द बोलणाऱ्यांना गजाआड करण्याचे एकमेव काम महाविकास आघाडी सरकारने पोलीस दलाला दिल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात सध्या दिसत आहे. मतभेद व्यक्त करणाऱ्यांची जरुर गळचेपी करा. त्याचा हिशोब नंतर जनता तुमच्याकडून घेईलच. पण, किमान राज्यातल्या मायलेकींचे संरक्षण तरी करा. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये महिलेचे डोळे फोडले, दिवसाढवळ्या पेट्रोलपंपावर बालिकेवर सामुहिक बलात्कार झाला. हे सरकार कुणासाठी चालवता?”

पुण्यातील शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात महिलेवर बळजबरी करण्यात आली. तिने विरोध केला असता आरोपीने महिलेचे दोन्ही डोळे निकामी करण्यात आलेत. याप्रकरणी अज्ञात ३० वर्षीय व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER