राज्याच्या हितासाठी पवारांच्या सल्ल्यानुसार पुढे जावे, संजय राऊतांचा नाना पटोलेंना सल्ला

Nana Patole - Sharad Pawar - Sanjay Raut

जळगाव : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींचं कौतुक केले असले तरी मोदींना सर्टिफिकेट देणारे संजय राऊत कोण? असा प्रश्न उपस्थित करुन नाना पटोले (Nana Patole) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाना पटोले यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवरुन शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला (Congress) डिवचले आहे. शरद पवार हे या सरकारचे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. त्यांनी सूतोवाच केले आहे, ती या राज्यातल्या जनतेच्या मनातली भावना आहे. निवडणुका या एकत्र लढाव्या लागतील. आजची राज्याची व्यवस्था अशीच पुढे न्यायची आहे. राज्याच्या हितासाठी पवार साहेब जे सल्ला देत आहेत, त्यानुसार निवडणुका एकत्र लढून पुढे जावे लागेल, असा टोला संजय राऊत यांनी नाना पटोले यांना लगावला.

यावेळी त्यांनी नाना पटोले यांनी जाहीर केलेल्या स्वबळाच्या हाकेवरही निशाणा साधला. नाना पटोले जर स्वबळावर लढून ते केंद्रात सत्ता आणणार असतील आणि मोदींना आव्हान उभे करीत असतील तर त्यांचे स्वागत आहे. काँग्रेसचा पंतप्रधान व्हायला हवा, आमचा त्यांना पाठिंबा असेल, असेही राऊत यांनी म्हटले.

नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हते तेव्हापासून भाजपची वाघाशी मैत्री होती. मैत्री कोणाशी करायचे हे वाघ ठरवतो. वाघ हा वाघ असतो.मग तो पिंजऱ्यातला असो किंवा जंगलातला. महाराष्ट्रावर वाघाचे राज्य आहे, असं म्हणत राऊत यांनी भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना टोला लगावला.

राज्यात सत्ता असली तरी संघटनेला बळ देणे, गावातला शिवसैनिक काय करत आहे, हे प्रत्यक्ष जाऊन पाहणे हे आमच्यासारख्या नेत्यांचे कर्तव्य आहे. म्हणून मी उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार हा दौरा करत आहे. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात संघटनेचे काम उत्तम प्रकारे सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button