आजही राज्यात नव्या रुग्णांनी ओलांडला २५ हजारांचाआकडा, ७० जणांचा मृत्यू

Corona Virus - Maharastra Today

मुंबई : गेल्या ३ दिवसांपासून राज्यात मोठ्या संख्येने नवे करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्यात अधिक कठोर निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. १७ मार्च रोजी राज्यात २३ हजार १७९ करोनाबाधित सापडले होते. १८ मार्च अर्थात गुरुवारी ही संख्या वाढून २५ हजार ८३३ इतकी झाली. तर आज राज्यात दिवसभरात २५ हजार ६८१ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण अ‍ॅक्टिव्ह करोनाबाधितांचा आकडा आता १ लाख ७७ हजार ५६० इतका झाला आहे. गेल्या ३ दिवसांत राज्यात तब्बल ७४ हजाराहून जास्त नवे रुग्ण सापडले आहेत. मात्र, यासोबतच आज दिवसभरात राज्यात १४ हजार ४०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, ही एक दिलासादायक बाब ठरली आहे.

मृतांचा आकडा देखील वाढताच!

दरम्यान, एकीकडे नव्या करोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. १५ मार्च रोजी राज्यात ४८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. १६ मार्च रोजी हाच आकडा थेट वाढून ८७ वर गेला. १७ मार्च रोजी पुन्हा ८४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू ओढवला. १८ मार्च रोजी हा आकडा कमी होऊन ५८ पर्यंत खाली आला होता. पण आज पुन्हा तो वाढून ७० रुग्णांचा करोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातला मृत्यूदर वाढून २.२० टक्क्यांपर्यंत गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER