सत्तेसाठी तुमचे मंत्री काका-पुतण्यासमोर लाचार, पडळकर सोनिया गांधींकडे तक्रार करणार

Maharashtra Today

मुंबई : सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसची मोठी गळचेपी होताना दिसत आहे. काँग्रेस मंत्र्यांच्या मागण्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री विशेषकरुन उपमुख्यमंत्री अजित पवार विरोध करताना दिसत आहे. यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)आता थेट काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी (Sonial Gandhi)यांच्याकडे तक्रार करणार आहेत. सत्तेत असूनही तुमचे मंत्री सत्तेसाठी लाचार आहेत. केवळ सत्तेसाठी
काका-पुतण्यापुढे लाचार असल्याचे सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं पडळकर यांनी सांगितलं.

गोपीचंद पडळकर यांनी टीव्ही-९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. काँग्रेसचे मंत्री केवळ सत्तेसाठी लाचार आहेत. सत्तेच्या लालसेपोटी हे लाचार मंत्री काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलावण्याचं काम करत आहेत. तुमचे मंत्री फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारानं किती काम करतात हे मी सोनिया गांधींना कळवणार आहे, असं पडळकर म्हणाले.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी एक ट्विट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनाही लक्ष्य केले. शरद पवार यांच्या पुढाकाराने स्थापित झालेलं आघाडी सरकार किती बहुजनद्वेष्टं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. या सरकारला मराठा आरक्षणाविषयी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी व पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात कुठलेही पाऊल उचलण्याची घाई नाहीये. पण न्यायालयाच्या निर्णयाआधीच आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची लगबग उडाली आहे. यावरून या सरकारची मानसिकता दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button