‘आता तरी केंद्राने महाराष्ट्राच्या रोल मॉडेलची दखल घ्यावी’, संजय राऊतांचा सल्ला

Sanjay Raut-PM Modi

मुंबई :- देशात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. एकेकाळी सर्वात जास्त कोरोनाचे रूग्ण आपल्या महाराष्ट्रात सापडत होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी ही परिस्थिती उत्तमप्रकारे हाताळली आहे. महाराष्ट्रात आता रुग्णसंख्येचा वेग मंदावत चालला आहे. महाराष्ट्राच्या रोल मॉडेलला आता देशात लागू करण्यात यावे. लोकांचा जीव वाचवण्यासाठी आता तरी केंद्राने राजकारण बाजूला ठेवत महाराष्टाच्या रोल मॉडेलला देशभरात लागूकरावं, असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज दिला. ते आज मुंबईत प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार कोरोना महामारीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी अशी मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. आज सर्वोच्च न्यायालयानेही कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आम्ही कोर्टाचे आभारी आहोत. कोरोनाच्या संकटामुळे सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्ट सक्रिय झालं आहे. कोरोना कोर्टापर्यंतही पोहोचला आहे. मला वाटत त्यांच्या घरापर्यंत कोरोना दाखल झाला आहे. कोर्ट बाधित झालंय, त्यामुळे देशाला नक्कीच काही ना काही फायदा होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. आजची परिस्थिती हे राष्ट्रीय संकटच आहे. जगही ते पाहत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हे संकट राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

भारतात कोरोनाचं संकट अधिकच वाढत चाललं आहे. देशातील जनता भीतीच्या सावटाखाली जगत आहे. काय होत आहे हे याची कल्पना लोकांना नाही. लोकांना मार्गदर्शन केलं जात नाही. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता देशाला महाराष्ट्र मॉडेलनेच काम करावं लागणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्राला बदनाम करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. पण कोरोनाच्या काळात महाराष्ट्राने उत्तम कार्य केलं आहे. त्याची दखल आज ना उद्या कोर्ट घेईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ही बातमी पण वाचा : … आता भाजप पुढारी कोणाकोणाचे राजीनामे मागणार आहेत? शिवसेनेचा सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button