दीड वर्षांपासून सत्ताधारी घरात बसून माश्याच मारत आहेत !’ भाजपचा मलिकांवर पलटवार

Maharashtra Today

मुंबई : सर्व केंद्राने करायचे, मग राज्याने काय माशा मारायच्या का? या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सवालावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. फडणवीसजी, तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय? माशा मारण्याचा आनंद घ्या, अशी खोचक टीका नवाब मलिक (NawabMalik) यांनी केली आहे. त्यावर आता भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय (Keshav Upadhyay) यांनी ट्विट करत मलिक यांच्या टीकेचा समाचार घेतला.

माशा मारण्याचा अर्थ कदाचित नवाब मलिक यांना ठाऊक नसावा किंवा कळून वळत नसावा. माशा मारण्याची स्पर्धा तर गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे. सत्ताधारी घरात लपून आहेत आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कोरोनाची परिस्थिती जाणून घेत आहेत. आता ज्या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहात, तेथे तरी किती वेळा गेलात? १० बालकांचे हत्यारे अजून का मोकळे आहेत? बाकी तुम्ही लोकांचे जीव वाचविण्यासाठी काम करताहात की गेलेले जीवांचे आकडे लपविण्यासाठी, हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतो आहेच, असे म्हणत उपाध्ये यांनी मलिकांवर टोला हाणला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button