पवारसाहेबांच्या प्रकृतीसाठी कार्यकर्त्यांकडून देव पाण्यात; मुंबईत होमहवन, पुण्यात विठ्ठलपूजा

Sharad Pawar - Maharastra Today

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. पवार (Sharad Pawar) यांच्या प्रकृतीसाठी सर्व स्तरातून प्रार्थना केली जात आहे. पुण्यातील विठ्ठल मंदिरात पवारांच्या समर्थकांनी देवाला साकडं घातलं. तर मुंबईतही होमहवन करण्यात आले होते.

पुण्यात जनता वसाहतीमधील विठ्ठल मंदिरात कार्यकर्त्यांनी पूजा केली. शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून देवाला साकडं घालण्यात आलं. तर काल मुंबईतील बोरीवलीतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी होमहवन आणि पूजा केली.  शरद पवारांच्या फोटोसमोर पूजा आणि हवन करण्यात आले होते.

दरम्यान शरद पवार यांच्या पित्तनलिकेत एक खडा अडकून बसला होता. हा खडा उघड्यावर राहू देणे योग्य नव्हते. त्यामुळे तातडीने त्यांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुर्बिणीद्वारे पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला. त्यामुळे शरद पवार यांच्या यकृतावरील दाब कमी होईल. शरद पवार यांना थोडा कावीळही झाला होता. तेदेखील कमी होईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांवर आणखी एक शस्त्रक्रिया होणार, राजेश टोपेंची माहिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button