पहिल्यांदाच ‘टॉप थर्टी’मध्ये अमेरिकन टेनिसपटू नसेल!

Tennis - Maharashtra Today

आंतरराष्ट्रीय आणि व्यावसायिक टेनिसच्या (Tennis) इतिहासात पहिल्यांदाच येत्या सोमवारी असे घडले की टॉप- 30 मध्ये एकही भारतीय नसेल. पुरुषांच्या व्यावसायिक टेनिसवर नियंत्रण ठेवणाऱ्या असोसिएशन आॕफ टेनिस प्रोफेशनल्स (ATP) ची क्रमवारी (ATP rankings) आॕगस्ट 1973 मध्ये सुरू करण्यात आली तेंव्हापासून पहिल्यांदाच असे घडेल की पहिल्या 30 खेळाडूत एकही अमेरिकन नसेल.

सद्यस्थितीत जागतिक क्रमवारीत अमेरिकन खेळाडूंमध्ये टेलर फ्रिटझ् (Taylor Fritz) हा सर्वात वरच्या म्हणजे 30 व्या स्थानी तर जाॕन आइसनर 39 व रेली ओपेल्का हा 46 व्या स्थानी आहे. परंतु माद्रिद येथील स्पर्धेत लवकर पराभूत झाल्याने येत्या सोमवारी जाहीर होणाऱ्या क्रमवारीत तो 32 व्या स्थानी घसरेल आणि एटीपी क्रमवारीच्या इतिहासात पहिल्यांदाच टॉप थर्टीमध्ये एकही अमेरिकन खेळाडू नसेल. जाॕन आइसनर हा माद्रिदच्या स्पर्धेत क्वार्टर फायनल गाठल्याने 39 वरुन 34 व्या स्दथानी प्रगती करेल पण टॉप थर्टीच्या बाहेरच असेल. रेली ओपेल्का हा 47 व्या स्थानी राहिल.

क्रमवारीत पहिल्या तीन स्थानी जोकोवीच, मेद्वेदेव व नदाल हे क्रमाने असतील. सध्या नदाल दुसऱ्या व मेद्वेदेव तिसऱ्या स्थानी आहे पण माद्रिदला नदाल झ्वेरैव्हकडून पराभूत झाल्याने एक स्थान खाली येणार आहे.

गंमत म्हणजे पुरुषांच्या एटीपी क्रमवारीत टॉप थर्टी मध्ये एकही अमेरिकन खेळाडू राहणार नसला तरी महिलांच्या वुमेन्स टेनिस असो. (WTA) जागतिक क्रमवारीत मात्र अमेरिकेच्या पाच खेळाडू पहिल्या 30 मध्ये राहणार आहेत. त्यात सोफिया केनीन (क्रमांक 4), सेरेना विल्यम्स (8), जेनिफर ब्राडी (13), मॕडिसन कीज (23) व अॕलिसन रिस्क (27) यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button