पवारांच्या पुढच्या पिढीकडून पहिल्यांदाच राजकीय टोलेबाजी, राजकारणात येण्याची चर्चा

Sharad Pawar - Revati Sule

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंबाभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे व पुतणे अजित पवार (Ajit Pawar) हे राज्याच्या राजकारणात अनेक दशकांपासून सक्रिय आहेत. मात्र याच कुटुंबातील पुढची पीढीही आता राजकीय आखाड्यात उतरू लागली आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या कन्या रेवती सुळे (Revati Sule) या नुकत्याच ट्विटरवर सक्रीय झाल्या आहेत. रेवती सुळे या आपल्या ट्विटर हँडलवरून कौटुंबिक जिव्हाळ्याचे फोटो शेअर करत असतात. मात्र आज रेवती यांनी राजकीय ट्वीट करत भाजपला टोला लगावला आहे. त्यामुळे त्या राजकारणात सक्रियहोणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

‘महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) वर्षपूर्तीनिमित्त मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचं अभिनंदन करते,’ असं ट्वीट रेवती सुळे यांनी केलं आहे. मात्र याच ट्वीटमध्ये त्यांनी भाजपवर शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे. ‘जागतिक महामारी आणि विरोधकांकडून राजकारण होत असतानाही राज्याला तुम्ही विकासाच्या रस्त्याने नेत आहात,’ असंही रेवती यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER