
निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना तिहाड तुरुंगात ठेवण्यात आलंय. उत्तर प्रदेशाच्या जल्लादाला तिहाडमध्ये बोलवून फाशी देण्याची तयारी सुरुये. बिहारच्या बक्सर जिल्ह्यातून यांच्या फाशीसाठी ( hang)१० दोरखंड मागवण्यात आलेत. दोषींना फाशी होणार हे साफ झालं असलं तरी कधी होणार हे मात्र स्पष्ट नाही.
या चार दोषींशिवाय अजून ३५ जणांना फाशी होणार आहे. यातल्या चार महिला आहेत. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांना फाशीवर लटकवण्यात येणार आहे. फाशीची शिक्षा व्हावी असा काय अपराध महिलांनी केला होता? काय देण्यात येईल यांना फाशी? त्यासाठी जाणून घ्या या चार महिलांच्या क्रुरतेची ही कहाणी.
त्यांच्यावरील आरोप तर होतेच पण भयावह सुद्धा. राष्ट्रपतीकडे केलेली दया याचिका फेटाळण्यात आल्यात. दया अर्ज फेटाळल्यानंतर या महिलांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्का मोर्तब करण्यात आलंय. याआधी कोणत्याच महिलेला स्वतंत्र भारताच्या इतिहासात फाशी देण्यात आलेली नाही. हरियाणाची सोनिया, उत्तर प्रदेशची शबनम, महाराष्ट्रातल्या रेणूका आणि सीमा अशी नावं या महिलेंची आहेत. जाणून घ्या त्यांच्या अपराधांबद्दल.
हरियाणाच्या सोनिने केली होती पित्यासह आठ जणांच्या हत्या
सोनियाचे (Sonia) वडील आमदार होते. रेलूराम त्यांच नाव. संपत्तीच्या लोभापायी तिनं २३ ऑगस्ट २००१ला सोनिया आणि तिचा पती संजीव यांनी मिळून रेलूरामसहित तिच्या परिवातल्या आठ जणांची हत्या केली. यानंतर २००४ला सत्र कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. २००५ला हायकोर्टाने ही शिक्षा जन्मठेपेत बदलली. २००७ला सर्वोच्च न्यायालायानं (SC)सर्वोच्च न्यालयानं सत्र न्यायालयाची शिक्षा अंतिम केली.
यानंर सोनिया आणि तिच्या पतीने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी हा अर्ज फेटाळला होता. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर यांनी अनेकदा तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.
प्रेमात आंधळ्या झालेल्या शबनमने केली होती ७ जणांची हत्या
शबनम ही उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील रहिवासी आहे. मथुरा तुरुंगात तिला फाशी दिली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. शबनमने आपल्या प्रियकराच्या मदतीने १५ एप्रिल २००८ रोजी आपल्या कुटुंबातील सात जणांची निर्घृण हत्या केली होती. त्यात तिचे आईवडील, दोन भाऊ, वहिनी, मावशीची मुलगी आणि पुतण्याचा समावेश होता.
लुटेऱ्यांनी घरावर हल्ला केला आणि यात घरच्यांना ठार केलं असा आरोप तिनं केला. जेव्हा शबनमने या हत्या केल्या तेव्हा शबनम सात महिन्यांची गरोदर होती.
शबनमच वय आता ३५ वर्ष असेल. या घटनेला आता १० वर्ष उलटलीयेत तरी शबनमच्या गावकऱ्यांना आजही या घटनेची आठवण आहे. राष्ट्रपतींकडे तिनं दयेचा अर्ज केला होता पण तो फेटाळण्यात आला. आपल्याच परिवारतल्या सात जणांची हत्या करणाऱ्या शबनमला कधी फाशी होईल याच्या प्रतिक्षेत तिचे गावकरी आहेत.
रेणूका आणि सीमा दोन बहिणींनी केल्यात लहान मुलांच्या हत्या
पुण्याच्या येरवडा तुरुंगात दोन महिला गेल्या २३ वर्षांपासून कैद आहेत. मोठी बहिण रेणूका आणि धाकल्या सीमान ४२ चिमुरड्यांची हत्या केलीये. या हत्यांमध्ये अंजना गावितही दोषी होती. तिचा मृत्यू तुरुंगातच आजारपणामुळं झाला. अंजना या दोन्ही महिलांची आई होती.
मुळ नाशिकमध्ये राहणारी अंजना तिच्या ट्रक ड्रायव्हर प्रेमीसोबत पळून आली. तिला रेणूका नावाची मुलगी झाल्यावर त्याने अंजनाला सोडून दिलं. रेणूका रस्त्यावर आली. एका वर्षानंतर तिनं रिटायर्ड सैनिक मोहन गावितशी लग्न केलं. तिला सीमा नावाची मुलगी झाली. काही दिवसानंतर मोहननं पण तिल सोडून दिलं. पुन्हा रस्त्यावर आल्यामुळं अंजनाने चोऱ्यामाऱ्या कारयला सुरुवात केली.
अंजना दोन्ही मुलींच्या मदतीनं लहान मुलांच अपहरण करु लागली. त्यांच्याकडून पुन्हा चोऱ्या करवून घेवू लागली. चोरी करताना मुलं पकडली गेली तर लहान मुलं बघून त्यांना लोक सोडून द्यायचे. अपहरण केलेल्या मुलांनी चोरी करायला नकार दिला तर त्यांना आदळून आदळून मारायची.
१९९० ते १९९६ या तिघींनी ४२ निष्पाप बालकांचा बळी घेतला. या घटनेचे महाराष्ट्रभर पडसाद उमटले. २००१ला दिवाणी न्यायालायने दोन्ही बिहिणींना फाशीची शिक्षा सुनावली. २००४ला सर्वोच्च न्यायालायने देखील हीच शिक्षा कायम ठेवली. यानंतर २०१४ला राष्ट्रपती प्रणब मुखर्जींनी यांचा दयेचा अर्ज फेटाळला. या केसला भारतातली ‘रेअरेस्ट ऑफ द रेअर केस’ मानलं जातं. या बहिणींना फाशी झाल्यास या फाशीवर लटणाऱ्या स्वातंत्र्य भारतातील पहिला महिला ठरतील.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला