नृसिंहवाडीत शेकडो वर्षात प्रथमच भक्तांविना दत्त जयंती साजरी

Kolhapur

कोल्हापूर : कोरोनामुळे (Corona) नृसिंहवाडी येथील दत्त जयंती उत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दत्त भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज दत्त जयंती दिन असूनही शुकशुकाट होता. शेकडो वर्षात प्रथमच भक्तांविना दत्त जयंती साजरी झाली. मंदिरात दत्त जयंतीचे सर्व पूजा विधी संपन्न झाले.

येथे दत्ताच्या मनोहर पादुका आहेत. दत्त जयंतीला भक्तांच्या गर्दीने फुलून जाणार्या दत्त राजधानी, पहाटेपासून भक्तांच्या रांगा लागतात. मात्र यावर्षी नृसिंहवाडीमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. गावकऱ्यांनी कोरोनामुळे भाविकांना प्रवेश बंदी केली होती. सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आले. नृसिंहवाडी हे पेढे आणि बासुंदीसाठी प्रसिध्द आहे. दत्त दर्शन घेतल्यानंतर भाविक पेढे आणि बासुंदी खरेदी करण्यासाठी देखील गर्दी करत असतात मात्र व्यापाऱ्यांनी संपूर्ण व्यवहार यावर्षी बंद ठेवले. उद्या, बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून नृसिंहवाडी येथे सर्व व्यवहार सुरळीत सुरू होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER