इतिहासात पहिल्यांदाच साडेतीन शक्तीपीठे भाविकांविना

Shri Shaktipith Darshan

मुंबई : कोरोनाचे (Corona) सावटात राज्यभरात काल, शनिवारपासून नवरात्रौत्सवाला (Navratri) उत्साहात प्रारंभ झाला. राज्यातील मंदिरे बंद असल्याने यंदा प्रथमच घटस्थापनेची पूजा भाविकांविना झाली.

कोल्हापुरातील अंबाबाई, तुळजापूरची भवानी माता, सप्तशृंगगडाची सप्तशृंगीदेवी, माहूरगडची रेणूका ही साडेतीन शक्तिपीठे शांत आहेत. हिरवी दसऱ्या आणि नवरात्र निमित्त या ठिकाणी सरासरी दहा ते पंधरा लाख भाविक भेट देतात.

यंदा मात्र अनेकांची ही दर्शनाची परंपरा खंडित झाली. भाविकांनी मुखदर्शन भाविकांनी मंदिराबाहेरूनच घेतले. अनेक मंदिरांनी ऑनलाईन दर्शनसेवा सुरू केल्याने भाविकांनी त्याचाही लाभ घेतला.

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात घटस्थापनेने शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने देवस्थानच्या अधिकृत वेबसाईटचे डिजिटलायझेशन करून एका क्लिकवर भाविकांना दर्शनासह इतर सेवा उपलब्ध करून दिल्या. तुळजापूर : ‘आई राजा उदो उदो…’च्या जयघोषात तुळजापुरात पहिल्यांदाच शुकशुकाट आणि संबळाच्या नादात महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवी मंदिरात घटस्थापना झाली. कोरोनामुळे यंदा भाविकांची अनुपस्थिती जाणवत असल्याने इतिहासात पहिल्यांदाच तुळजापुरात शुकशुकाट आहे. पुजारी, मानकरी आदींच्या उपस्थितीत 9 दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.

सप्तशृंगगडावर उत्साहात सुरुवात

सप्तशृंगगड : आद्य शक्तिपीठ असलेल्या वणीच्या सप्तशृंगगडावरही शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. यात शनिवारी पहाटेपासून विविध धार्मिक पूजाअर्चा यासह महावस्त्र व देवीच्या अलंकारांची पूजा करत साधेपणाने मिरवणूक काढण्यात आली. गडावर साजरा होणारा देवीचा नवरात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द झाला असला, तरी धार्मिक वातावरणात गडावर देवीची पंचामृत महापूजा झाल्यानंतर उत्सवाला घटस्थापना प्रारंभ झाला. करत आदिशक्तीच्या भाविकांसाठी देवी संस्थानच्या माध्यमातून यू ट्यूब तसेच संस्थानच्या फेसबुक पेजवरील या https://youtu.be/4-GliYbieBU संकेतस्थळावर 24 तास ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रेणुकामाता (माहूरगड)
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. यंदा गडावर शांतता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER