मराठीसाठी बाळासाहेबांनी तुरुंगवास भोगला अश्या शिवसेनेला ज्ञानामृत पाजू नये – संजय राऊत

Sanjay Raut - Devendra Fadnavis - Balasaheb Thackeray - Maharastra Today

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर शिवसेनेने मोठं आंदोलन केलं. शिवसेनेने सीमा लढ्यात ६७ हुतात्मे आम्ही दिले. बाळासाहेब ठाकरेंनी तीन वर्षाचा कठोर तुरुंगवास भोगला. त्यामुळे सीमावासिय आणि मराठीबद्दलच प्रेम आम्हाला शिकवण्याची गरज नाही, आम्हाला कुणी ज्ञानामृत पाजू नये. तुमचं मराठी प्रेम दिसून आलं आहे, असे टीकास्त्र शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सोडले.

आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती गेल्या ६५ वर्षांपासून संघर्षरत आहे. या संघटनेच्या नेतृत्वात आम्ही मोठं आंदोलन केलं. शुभम शेळके तिकडे लोकसभेच्या निवडणुकीत उभे आहेत. त्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी गेलो होतो. हा निव्वळ दौरा नव्हता. आमचे कितीही मतभेद असले तरी महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी शुभम शेळकेंना पाठिंबा द्यायला पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही तिकडे गेले होते. शुभम शेळके या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी होतील याचा आम्हाला विश्वास आहे, असं राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आता विरोधी पक्षनेते आहेत. बेळगाव, कारवार महाराष्ट्रात येण्यासाठी मुख्यमंत्री असताना फडणवीसांच्या नेतृत्वातच ठराव मंजूर झाले आहे. एकीकरण समितीचे लोक जेव्हाही त्यांची भेट घ्यायचे तेव्हा आम्ही तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत, अशी ग्वाही द्यायचे. तसं वचनच त्यांनी दिलं होतं. आज एकीकरण समितीला त्यांच्या पाठिंब्याची गरज होती. मात्र आता फडणवीसांनी वेगळी भूमिका घेतली आहे. बेळगावात मराठी माणसाच्या विरोधात प्रचार करू नये असं आमचं आवाहन आहे. ते सर्वांनी मान्यही केले आहे. फक्त भाजपने वेगळी भूमिका घेतली आहे, महाराष्ट्र त्याची नोंद करून ठेवेल, असं त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रात लावलेल्या संचारबंदीबाबत प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री फार सौम्यपणे परिस्थिती हाताळत आहेत. ते माणुसकी आणि दया दाखवत आहेत. लोकांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री चिंतेत आहेत. त्यांनी कडक पावलं उचलली पहिजे, असं सांगतानाच कोरोनाचे नियम पाळा. मुख्यमंत्र्यांना कठोर पावलं उचलण्यासाठी प्रवृत्त करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. तसेच सरकारला टेकू कसा लावायचा हे अजित पवारांना माहीत आहे. पहाटे शपथ घेऊन दुपारी त्यांनी सरकार स्थापन केलं. अजित पवार हे संपूर्ण ऑपरेशनमध्ये सर्जन आहेत, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button