महाराष्ट्रासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने कर्तृत्वशून्य मुख्यमंत्र्याला ‘जय महाराष्ट्र’ करावा – नारायण राणे

Narayan Rane - Mahavikas Aghadi

मुंबई : राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र देशातील इतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. महाराष्ट्राच्या या अधोगतीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) जबाबदार आहेत. चुकीच्या धोरणामुळे कोरोनाला आटोक्यात ठेवण्यात हे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भाजपचे (BJP) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला. तसेच महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आता सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसने (Congress) अश्या कर्तृत्वशून्य मुख्यमंत्र्याला ‘जय महाराष्ट्र’ करावा, अशी मागणीही त्यांनी केली. ते आज मुंबईतील भाजपच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी नारायण राणे म्हणाले की, ‘ठाकरे’ सरकार (Thackeray Government) सर्वच गोष्टीत सपशेल अपयशी ठरले आहे.

मुख्यमंत्री राज्यात लॉकडाऊन (Lockdown) लावण्याच्या तयारीत आहे. मात्र सरकारमधील त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस लॉकडाऊनसाठी उतावीळ दिसत नाहीत. कोरोना सुरु झाला त्यावेळी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अशी त्यांनी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांना माझी जबाबदारी पेलवली. मात्र राज्यातील जबाबदारी पेलवली नाही. स्वतः घरात बसून केवळ घोषणाबाजी करण्यात वेळ घालवला. राज्यात कोरोना वाढण्यामागे मुख्यमंत्र्याचं धोरण कारणीभूत आहे. तुम्ही वर्षभरात बेड उपलब्ध करु शकले नाहीत. मग तुम्ही काय करु शकले?, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला. अश्या कर्तृत्वशून्य मुख्यमंत्र्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेसने ‘जय महाराष्ट्र’ करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा लॉकडाऊनला विरोध आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन करण्यासाठी उतावीळ आहेत. त्यामागचा हेतू काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही. लोकांकडे आता पैसे शिल्लक राहिलेले नाही. सगळे व्यवसाय कोलमडले आहेत. सरकार फसवाफसवीचे धंदे करतात.

राज्यात कायदा-सुव्यवस्था नाही. सकाळी माणूस कामावरुन निघाला तर संध्याकाळी जिवंत परत जाईल, याची शाश्वती नाही. सचिन वाझे (Sachin Vaze) सुरक्षेसाठी की गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसाठी काम करत होते का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button