करवा चौथसाठी श्रीदेवीने विमान वळवून चंद्राचे घेतले होते दर्शन

shridevi -boney Kapoo

बॉलिवूडच्या (Bollywood) चित्रपटात करवा चौथला खूपच महत्व देण्यात आलेले आहे. यशराज फिल्म्सने याची सुरुवात केली होती. त्यानंतर बॉलिवूडमधील विवाहित अभिनेत्री करवा चौथ मोठ्या प्रमाणावर साजरा करीत असताना दिसून आले. माध्यमांनीही विवाहित अभिनेत्रींच्या करवा चौथला (Karva Chauth) मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली. त्यामुळे हे लोण आता संपूर्ण भारतात पसरले आहे. पूर्वी करवा चौथ फक्त पंजाबी कुटुंबातच साजरे केले जात होते. महाराष्ट्रातील विवाहित महिला पतीच्या उदंड आयुष्यासाठी वटपौणिमेचे व्रत करतात.

दक्षिण भारतातून मुंबईत येऊन चित्रपटसृष्टीत श्रीदेवीने (Shridevi) स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. पंजाबी बोनी कपूरबरोबर लग्न केल्यानंतर श्रीदेवी करवा चौथ मोठ्या प्रमाणावर साजरा करीत असे. दिवसभर उपवास करून संध्याकाळी चाळणीतून चंद्र आणि पतीचे दर्शन घेतल्यानंतरच विवाहित महिला करवा चौथचा उपवास सोडतात. श्रीदेवीचा करवा चौथचा एक किस्सा खूपच चर्चेत आहे. करवा चौथच्या दिवशी श्रीदेवी पती बोनीबरोबर मेक्सिकोवरून लॉस एंजिलिसला जात होती. त्यांची फ्लाईट रात्रीची होती. करवा चौथमुळे श्रीदेवीने दिवसभर उपवास धरला होता. रात्री तिला उपवास सोडायचा होता. पण विमानात असल्याने चंद्राचे दर्शन होणे कठिण होते. तेव्हा श्रीदेवीने पायलटला विनंती केली की, विमानातून चंद्राचे दर्शन होईल असे काही तरी करा. विमान थोडे वळवा. पायलटनेही श्रीदेवीचे ऐकले आणि खिडकीतून चंद्र दिसेल याची काळजी घेतली. श्रीदेवीने चंद्राचे दर्शन घेतले आणि उपवास सोडला होता. स्वतः श्रीदेवीनेच ही माहिती दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER