इरफान खानच्या अंत्यदर्शनाला फक्त २० जणांची परवानगी

Irrfan Khan

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले. आज दुपारी ३ वाजता त्यांचे पार्थिव इस्पितळातून स्मशानात नेण्यात आले. माहितीनुसार, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कडक बंदोबस्त करण्यात आला. अंत्यदर्शनासाठी चाहते किंवा कोणत्याही सेलिब्रिटीला तिथपर्यंत जाण्याची परवानगी नव्हती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनेता इरफान खानला वाहिली श्रद्धांजली

अंत्ययात्रेत फक्त २० जणांना परवानगी देण्यात आली. मुंबई पोलिसांच्या देखरेखीखाली इरफान यांना अंधेरीतील यारी रोड, वर्सोवा स्मशानभूमीत दफन करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी चाहते, मीडिया आणि सिनेसृष्टीतील इतर कोणत्याही व्यक्तीला गर्दी करण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी दिली नाही.