तजेलदार चेहऱ्यासाठी वापरा ‘चारकोल मास्क’…

charcol

त्वचा उजळण्यासाठी आपण वेग-वेगळ्या मास्कचा उपयोग करतो. त्यात आणखी एक मास्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तो म्हणजे चारकोल मास्क. त्वचेचा तजेला परत आणण्यासाठी चारकोल मास्क अतिशय फायदेशीर ठरतो. त्याचबरोबर ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून सूटका होते. हे मास्क घरी देखील बनविता येतो. बघा कसा तयार होतो हे मास्क आणि त्याचे फायदे..

  • पिंपल्स असणाऱ्यांसाठी मास्क :- पिंपल्स पासून सुटका मिळवण्यासाठी चमचाभर कोरफड जेल, एक चमचा हळद आणि एक चमचा अॅक्टीव्हेटेड चारकोल घालून पेस्ट तयार करा. यात थोडे पाणी घालून पॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवा.

  • बंद पोर्स साफ करण्यासाठी मास्क :- बंद पोर्स साफ करण्यासाठी एक चारकोल कॅप्सूलमध्ये गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. १० मिनिटांनी चेहरा धुवा.

  • पील ऑफ मास्क :- पील ऑफ मास्क बनवण्यासाठी सर्वात आधी ३ अॅक्टीव्हेटेड चारकोलच्या कॅप्सूल्स घ्या. या कॅप्सुल्समध्ये व्हिटॉमिन ऑईल, बेंटोनाईट माती, ग्लिसरीन आणि मध घालून पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये थोडे पाणी घालून चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनंतर मास्क चेहऱ्यावरून पील करा. आणि चेहरा कोमट पाण्याने धुवा.