दिल्ली मॉडेल नव्हे गोवा मॉडेलच सरस : मुख्यमंत्री सावंत

Pramod Sawant

गोवा : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोना बाधित (Corona virus) रुग्णांवर केवळ केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे नियंत्रण आले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांना आपण रक्षणकर्ते असल्याचा काही लोक केवळ दिखावा करत असून ते चुकीचे आहे. हेच लोक कोरोनाच्या ‘दिल्ली मॉडेल’विषयी बोलत असले तरी कोरोना रुग्णांच्या उपचाराबाबतीत ‘गोवा मॉडेल’च सर्वोत्तम असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी स्पष्ट केले.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्ली गोवा सरकार ने कोरोना संबंधी व्यवस्थापनासाठी दिल्ली सरकारचे मॉडेलचा वापर करावा, असा सल्ला दिला होता. केजरीवाल यांचे नाव न घेता सावंत म्हणाले, की दिल्लीत ज्यावेळी केंद्र सरकारने कोरोनाबाबतचे व्यवस्थापन आपल्या हातात घेतल्यानंतर तेथील कोरोनाचे चित्र सुधारण्यास सुरवात झाली आहे. दिल्ली मॉडेलच्या बाता मारणाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी पुरवलेल्या सोयी- सुविधांमुळे कोरोना व्यवस्थापन सुधारले असल्याचे आधी लक्षात घ्यावे. आम्हाला आणखी दुसऱ्या कोणत्याही मॉडेलची गरज नसून गोवा मॉडेलच सर्वात चांगले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER