जन्म-मृत्यूच्या नोंदणीसाठी ‘आधार’ सक्तीचे नाही

Aadhar Card

नवी दिल्ली :- जन्म किंवा मृत्यूची नोंद करण्यासाठी संबंधित व्यक्तीचा ‘आधार क्रमांक’ ओळख पटविण्यासाठी पुरावा म्हणून देणे सक्तीचे नाही, असा खुलासा भारत सरकारच्या महानिबंधक (Registrar General) कार्यालयाने केला आहे.

आंध्र  प्रदेशातील विशाखापट्टण येथील नागरिक अनिऊल कुमार राजगिरी यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये (RTI Act)) केलेल्या अर्जाच्या उत्तरात हा खुलासा करण्यात आला. महानिबंधकांनी म्हटले की, भारतात जन्म-मृत्यूची नोंद त्यासाठी केलेल्या सन १९६९ च्या कायद्यानुसार केली जाते. त्या कायद्यात जन्म-मृत्यूच्या नोंदणीच्या वेळी ‘आधार’सारखा पुरावा घेण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे ‘आधार’ कायद्यानुसार ज्या गोष्टींसाठी ‘आधार’ सक्तीचे आहे त्यात या नोंदणीचा समावेश होत नाही.

मात्र नोंदणी करू इच्छिणार्‍या व्यक्तीने स्वेच्छेने ‘आधार’ क्रमांक दिला तर तो ओळख पटविण्यासाठी ग्राहय पुरावा म्हणून स्वीकारला जाईल. मात्र नोंदणी कार्यलयाने असा ‘आधार’ क्रमांक घेताना त्यातील सुरुवातीचे आठ अंक वाचता येणार नाहीत अशा प्रकारे काळ्या रंगाने झाकून घ्यावेत, असाही खुलासा करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER