
ब्युनोस आयर्स :- अर्जेंटीनाचा फूटबॉल सुपरस्टार दिएगो मॅराडोना याचे हृदयगती बंद पडल्याने बुधवारी निधन झाले. तो ६० वर्षांचा होता. १९८६ मध्ये अर्जेंटीनाच्या विश्वविजयाचा तो शिल्पकार होता. या महिन्याच्या सुरुवातीलाच त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अर्जेंटीना फूटबाॉल असो.ने या वृत्ताची पुष्टी केली आहे. व्टीटरवर त्यांचे अध्यक्ष क्लाोडीयो तापिया यांनी दिएगो मॅराडोना यांच्या निधनाबद्दल आपल्याला अतिव दु:ख होत असल्याचे म्हटले आहे. तो आमच्या हृदयात कायम राहील असेही त्यांनी म्हटले आहे. त्याच्यावर मद्यमुक्तीसाठीही उपचार सुरु होते. त्याच्या मेंदू आणि मेंब्रेनदरम्यानच्या जागेत रक्त साकोळले होते. डिप्रेशन, अनिमया, डीहायड्रेशनची लक्षणे त्याच्यात सुरुवातीला दिसत होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला