सलमान खान गरजूंच्या मदतीसाठी भाईजान तत्पर ; ‘बिइंग हंगरी’चा ट्रक रवाना

Being Haangry salman khan

मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेक मजूर आपआपल्या घरी पायी चालत निघाले आहेत. खाण्यापिण्याची सोय नसल्याने अनेकजण उपाशीपोटीच पायपीट करत आहेत. अशा लोकांना अभिनेता सलमान खान याने मदतीचा हात पुढे केला आहे. सलमान खानने ‘बिइंग हंगरी’ नावाचा एक ट्रक सुरू केला आहे. या ट्रकमधून तो गरजूंना रेशन देतोय. याबाबतची माहिती त्याच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र याबाबत सलमान खानने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

शिवसेनेचे युवानेता राहुल कनाल यांनी ट्विटरवर फूड व्हॅनचा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्याने या ट्विटमध्ये सलमान खानचे आभार मानले आहेत. धन्यवाद, सलमान भाई अगदी शांतपणे असे काही केल्याबद्दल. मात्र सलमानच्या अधिकृत अकाऊंटवरून अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.