उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर परमबीर सिंग म्हणाले, ‘नो कमेंट्स’

Parambir Singh - Maharastra Today

मुंबई :- राज्यात मनसुख हिरेन हत्याप्रकरणात सचिन वाझे याचे नाव चांगलेच चर्चेत असतानाच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा लेटरबॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, आज या प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या आदेशांनंतर परमबीर सिंग (Parambir Singh) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुंबई हायकोर्टाने १०० कोटींच्या वसुलीच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर सर्वांचे लक्ष हे परमबीर सिंग यांच्या प्रतिक्रियेकडे लागले होते. मात्र परमबीर सिंग यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया देणे टाळले आहे. आय हॅव नो कमेंट्स, एवढ्या चार शब्दातच परमबीर सिंग यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button