पेट्रोल-डिझेलपाठोपाठ खतांच्या किमतीही वाढल्या; राष्ट्रवादीकडून आंदोलनाचा इशारा

Jayant Patil - Petrol Price Hike - Maharashtra Today

मुंबई :- एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे (Corona Crisis) सामान्य नागरिक आर्थिक विवंचनेत सापडला असताना दुसरीकडे पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या खतांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. आता या दरवाढीविरोधात राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले आहे. राष्ट्रवादीने आता थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खत दरवाढीविरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने आता दुसरा धक्का देत खतांच्या किमती भरमसाट वाढवून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम केलं असून केंद्राच्या या धोरणाचा निषेध म्हणून राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्यानंतर आता केंद्र सरकारने दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाट वाढवल्या आहेत. १०.२६.२६ ची किंमत ६०० रुपयांनी वाढली तर डीएफएची किंमत ७१५ रुपयांनी वाढली आहे. डीएफएची  अगोदर ११८५ रुपये किंमत होती ती आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०.२६.२६ च्या ५० किलोच्या पोत्यासाठी ११७५ ऐवजी १७७५ रुपये द्यावे लागणार आहे. पोटॅशच्या किमतीही वाढल्या आहेत. देशातील खतांची किंमत मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं पाप केंद्रातील भाजप सरकारनं केलं आहे. राष्ट्रवादीतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांवर वेगळ्या प्रकारचा बोजा लादला असून केंद्राने ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button