पवारांपाठोपाठ नारायण राणेही राज्यपालांच्या भेटीला

Narayan Rane-Governor

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असतानाच राज्यात राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. कोरोनाची स्थिती हाताळण्यास राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा ठपका विरोधी पक्ष भाजपाने ठेवला.  त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने होताना दिसत आहेत.

ही बातमी पण वाचा : पडद्यामागे राजकीय हालचालींना वेग; राज्यपाल आणि पवारांची भेट, चर्चेला उधाण

आधी संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतली तेव्हा त्यांचा साक्षात दंडवत घालावा असा नमस्कार करतानाचा राऊत यांचा फोटो व्हायरल झाला. त्यानंतर राज्यपालांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटीसाठी बोलावले. शरद पवार यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली. त्यानंतर आता भाजपचे खासदार नारायण राणे हे सायंकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेणार आहेत. यामुळे भाजपच्या गोटात पडद्यामागे राजकीय हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER