मोदी आणि अमित शहा यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील लोकसभा निवडणूकीतील देदिप्यमान यशामुळे ते देशातील सर्वात शक्तीशाली नेते म्हणून समोर आले आहे. तर जागतिक पातळीवरही त्यांचा दबदबा वाढला आहे. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या क्रमांक आहेत. सध्याच्या घडीला देशातील हे दोन नेते अनुक्रमे पहिल्या व दुस-या क्रमांकावर असले तरी त्या दोघांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा क्रमांक आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेला भाजपचे सर्वाधिक फोलोअर्स आहेत. सोशल मीडियावरही मोदी आणि शहा यांचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. मात्र त्यांच्यानंतर फेसबुकवर सर्वाधिक फालोअर्स असणा-यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा क्रमांक लागलो. राजकीय नेत्यांपैकी मोदी आणि शाह यांच्यानंतर फडणवीसच आहे, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.
मोदींचे फेसबुकवरील तब्बल 44 दशलक्ष फॉलोअर्स आहेत त्यानंतर अमित शहा यांचे त्यांचे फेसबुकवर 14 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. उभय नेते फेसबुक पेजवर आपल्या रोजच्या घडामोडी मांडत असतात. त्यानंतर फेसबुकवर महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच क्रमांक आहे. फडणवीस यांचे फेसबुकवर 9.2 दशलक्ष फॉलोअर्स आहे. महाराष्ट्रात ऐवढे मोठे फॉलोअर्स असलेले ते एकमात्र नेते आहेत.

केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, स्मृती इराणी, राज्यवर्धन सिंह राठोर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या भाजप नेत्यांसह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या दिग्गज नेत्यांना फेसबुकवर फॉलोवर्सच्या बाबतीत फडणवीस यांनी मागे टाकले आहे.