मालाड पाठोपाठ दहिसर येथेही दुर्घटना; ३ घरे कोसळली, एका तरुणाचा मृत्यू

3 Houses Collapsed At Lokhandi Chawl Dahisar

मुंबई : मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होताच दुर्घटनांचे सत्र सुरू झाले आहे. मुंबईत पहिल्याच पावसानंतर बुधवारी रात्री मालाडमध्ये मोठी इमारत दुर्घटना घडली. त्यापाठोपाठ आता दहिसरमध्येही ३ घरं कोसळल्याची घटना घडली आहे. दहिसर येथे झालेल्या या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यानंतर अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल झाले. त्यांच्याकडून बचावकार्य सुरु आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दहिसर पूर्वच्या केतकीपाडा परिसरात ही दुर्घटना घडली आहे. शिवाजी नगर मधील लोखंडी चाळ येथे ही घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे ही घरे कोसळली असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या दुर्घटनेत प्रद्युमन सरोज या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे तर आणखी एक तरुण जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ३ घरं कोसळल्यामुळे काहीजण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button