आशिष शेलार यांच्याकडून पत्रकार कमलेश सुतार यांची पाठराखण, म्हणाले…

Ashish Shelar - Kamlesh Sutar

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana Ranaut) महाराष्ट्र सरकार व शिवसेनेविरोधात (Shiv Sena) आघाडीच उघडली आहे.

रणौतनं टाईम्स एका वृत्तवाहिनीशी बोलताना तिच्या मतदानाविषयीचा किस्सा सांगितला होता. आपल्याला भाजपाला मतदान करायचं होतं, मात्र तिथे फक्त शिवसेनेचंच चिन्ह होतं. नाईलाजाने आपल्याला शिवसेनेला मतदान करावं लागलं, असं कंगनानं म्हटलं होतं. त्यावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील पत्रकार कमलेश सुतार (Kamlesh Sutar) यांनीही कंगनाच्या विधानातील चूक लक्षात आणून दिली. मात्र, कंगनानं त्यांनाच न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला. नंतर कंगनानं ते ट्विट डिलीटही करुन टाकले.

या सगळ्या वादावर आता भाजपाचे (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट केलं आहे. कमलेश सुतार याने वांद्रे पश्चिम विषयी जी स्टोरी केली, त्यात पत्रकार म्हणून त्याने सत्य मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात चूक काहीच नाही. तो माध्यम म्हणून त्याचा अधिकार आहे. हे आता कुणाला नव्याने सांगण्याची गरज नाही. पत्रकार म्हणून सन्मित्र कमलेशला मी अनेक वर्षे ओळखतो, असं म्हणत शेलार यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER