आव्हाडांकडून संजय राऊतांची पाठराखण; म्हणाले, कधी कधी ते पत्रकारासारखं बोलून जातात !

Jitendra Awhad - Sanjay Raut

मुंबई :- संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून होत असलेल्या लॉबिंगविषयीही काँग्रेसने (Congress) नाराजी व्यक्त केली. संजय राऊत यांनी यूपीएचे (UPA) अध्यक्षपद सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याऐवजी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी उचलून धरली आहे. या मुद्द्यावरून नाराज असलेल्या काँग्रेसच्या नाराज नेत्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यावरून महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष नाराज आहे का, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना विचारण्यात आला. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी मी राष्ट्रवादीचा (NCP) नेता आहे, मला काँग्रेसच्या नाराजीबाबत माहिती नाही, असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेली.

यावेळी आव्हाड म्हणाले की, सरकार म्हणजे घर आहे. घरात थोडासा वाद होणारच. लॉकडाऊनसंदर्भात तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील. त्याबाबत कुठेही संभ्रम नसेल. संजय राऊत हे नेता आणि पत्रकार अशा दोन भूमिकांमध्ये वावरत असतात. त्यामुळे ते कधी कधी पत्रकारासारखं बोलून जातात, असे म्हणत त्यांनी राऊतांची पाठराखणही केली.

ही बातमी पण वाचा : ‘काँग्रेसला डिवचणाऱ्या वाचाळवीर संजय राऊतांना आवरा’, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button