श्रीदेवीच्या पावलावर पाऊल टाकत श्रद्धा कपूरही बनणार ‘चालबाज’

Maharashtra Today

साऊथमधून मुंबईत येऊन बॉलिवूडमध्ये श्रीदेवीने (Sridevi) मोठ्या मेहनतचीने क्रमांक एकचे स्थान प्राप्त केले होते. तिच्या अभिनयाची रेंज ‘सदमा’ ते ‘मॉम’पर्यंत विविध सिनेमातून दिसून येते. तिच्या करिअरमधील गाजलेल्या सिनेमांमध्ये ‘चालबाज सिनेमाचे पहिल्या पाचात समावेश केला जातो. रुपेरी पडद्यावर दुहेरी भूमिका साकारणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. पण सगळ्यांचेच ते स्वप्न पूर्ण होते असे नाही. श्रीदेवीने मात्र ‘लम्हे’, ‘खुदा गवाह’, ‘चालबाज’, ‘गुरु’, ‘नाकाबंदी’, ‘बंजारन’ अशा काही सिनेमांमध्ये दुहेरी भूमिका साकारली आहे. १९८९ मध्ये आलेला श्रीदेवीचा ‘चालबाज’ हा हेमा मालिनीच्या (Hema Malini) ‘सीता और गीता’ सिनेमाची रिमेक होता. या सिनेमात सनी देओल (Sunny Deol) आणि रजनीकांत (Rajnikanth) श्रीदेवीचे नायक होते. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झालेल्या या सिनेमाचा आता सिक्वेल तयार करण्याची योजना आखण्यात आली असून श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) श्रीदेवीच्या पावलावर पाऊल टाकून चालबाज बनताना दाखवली जाणार आहे. श्रद्धा कपूर अभिनीत या सिनेमाचे नाव ‘चालबाज इन लंडन’ ठेवण्यात आले असून यात श्रद्धा दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. श्रद्धा कपूर प्रथमच दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमाचा पहिला टीझर नुकताच रिलीज करण्यात आला.

‘चालबाज इन लंडन’ या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार, कृष्‍ण कुमार, अहमद खान आणि शायरा खान करणार असून दिग्दर्शन पंकज पराशरच करणार आहे. पंकज पराशरनेच श्रीदेवीच्या ‘चालबाज’चे दिग्दर्शन केले होते. श्रद्धा कपूरने सिनेमाची घोषणा करणारा टीझर तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. या टीझरमध्ये सिनेमाची माहिती देण्यात आली आहे. टीझरसोबत श्रद्धाने म्हटले आहे, या सिनेमासाठी मी खूपच एक्सायटेड झाली आहे. टीझरमध्ये मूळ चालबाज सिनेमाचेच संगीत वापरण्यात आल्याचेही दिसत आहे. या सिनेमाचे पुढील महिन्यात शूटिंग सुरु केले जाणार असून याच वर्षी दिवाळीनंतर सिनेमा रिलीज करण्याची योजना आखण्यात आली आहे. मात्र रिलीजची तारीख अजून नक्की करण्यात आलेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button