नियम पाळा अन्यथा विनाकारण फिरल्यास पोलीस कारवाई करेल; गृहमंत्र्यांचा इशारा

Dilip Walse Patil - Maharastra Today

मुंबई :- कोरोनाची (Corona) स्थिती अतिशय बिकट होत चालली आहे. संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी आज रात्री ८ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरू नका; अन्यथा पोलीस कारवाई करतील, असा इशारा दिला आहे.

लोकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्हा अंतर्गत आणि इतर राज्यातूनही वाहतूक-प्रवास करता येईल. मात्र, विनाकारण बाहेर पडल्यास पोलीस कारवाई करतील. वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदीची व्यवस्था केली आहे. मागच्या वेळेची टाळेबंदी आणि आताची संचारबंदी यामध्ये फरक आहे. लोकांनी स्वतःहून काळजी घेणे गरजेचे आहे.

दुसरीकडे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची चौकशी सुरू आहे. ते चौकशीला सामोरे जात आहेत. त्यामुळे चौकशी सुरू असताना यावर बोलणे योग्य होणार नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

फडणवीसांच्या टीकेला अर्थ नाही
कडक निर्बंध लावत सरकारने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे केवळ धूळफेक आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली होती, यावर गृहमंत्री म्हणाले की, फडणवीस यांच्या टीकेला काही अर्थ नाही. सरकारने गोरगरिबांसाठी जे पॅकेज जाहीर केले आहे, त्याचा लोकांना संचारबंदीच्या काळात फायदाच होणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने १५ दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. आज रात्री ८ वाजल्यापासून हे निर्बंध लागू होतील. ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत कोरोना साखळी तोडण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले आहे. मात्र, या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button