नियम पाळा अन्यथा : कडक लॉकडाउन ना. जयंत पाटील

Jayant Patil

सांगली : सांगलीत कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गर्दीच्या ठिकाणी भरणारे बाजार, फेरीवाले थांबविण्यात येतील. त्यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासन, पोलिस यांना दिल्या आहेत. यामध्ये जर अपयश आले तर लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारावा लागेल, असा इशारा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील (Jayant Patil) यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. ना. पाटील म्हणाले, जिल्ह्यात जनता कर्फ्यू चालू असून हा सर्वांसाठी आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.

ते म्हणाले, जिल्ह्यातील शहरे व ग्रामीण भागातील बाजारात होणारी गर्दी हा एक चिंतेचा विषय आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करावी. जिल्हा प्रशासन व पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी कडक भूमिका स्वीकारावी.

जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पोलिस यंत्रणा आता कार्यरत होईल. जनजीवन चालू राहील पण गर्दीच्या ठिकाणी भरणारे बाजार सर्व थांबविण्यात येतील. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्नशील असून यामध्ये जर अपयश आले तर लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारावा लागेल, असा इशारही ना. पाटील यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER